मोदीतास’ ऐच्छिकच
पंतप्रधानांचे आज शिक्षण क्षेत्राला मार्गदर्शन
भाषणाच्या प्रसारणाची शाळांवरील सक्ती मागे
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
शिक्षणाची महती सांगणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण आज, शुक्रवारच्या शिक्षक दिनी प्रसारित होणार आहे. पण हे भाषण ऐकवण्याची सक्ती मात्र केंद्र सरकार तसेच राज्य सरकारनेही मागे घेतल्याने शिक्षक-मुख्याध्यापक-विद्यार्थी आणि पालकांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या सूचनेनंतर गुरुवारी शालेय शिक्षण सचिव अश्विनी भिडे यांनी भाषण विषय ऐच्छिक असल्याचे जाहीर केले.
आजच्या शिक्षक दिनाचे औचित्य साधून देशभरातील शाळांतील विद्यार्थी-शिक्षकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्गदर्शन करणार आहेत. मोदींचे हे भाषण शाळांमध्ये दाखविण्याची सक्ती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने केली होती. त्यापाठोपाठ राज्य सरकारनेही हा निर्णय राबवला. पण या सक्तीविरोधात राज्यातील शिक्षक संघटनांनी आवाज उठवला. पश्चिम बंगाल, केरळ व तामिळनाडूतही अशाच प्रतिक्रिया उमटल्याने अखेर केंद्राने भाषण दाखवण्याची सक्ती नसल्याचा पवित्रा घेतला. पण तरीही राज्य सरकारने कोणतीच भूमिका जाहीर न केल्याने संभ्रम निर्माण झाला होता. गुरुवारी मात्र सरकार जागे झाले. मोदी यांचे भाषण दाखवण्याची अथवा ते पाहण्या-ऐकण्याची कुणाही शाळा अथवा विद्यार्थ्यावर सक्ती नसल्याचे राज्य शालेय शिक्षण विभागाने जाहीर केले.
कधी : दुपारी २.३० ते ४.४५
कुठे : विविध शाळा, आकाशवाणी
शिक्षण सचिवांचा खुलासा
ज्या शाळांना शिक्षक दिनी भाषण दाखवता येणार नाही, त्यांनी १० सप्टेंबरपर्यंत कधीही त्याचे प्रसारण करावे
ज्या शाळा शिक्षक दिनाच्या दिवशी सकाळच्या सत्रात भरत आहेत, त्यांना शाळा दुपारी सुरू ठेवण्याचीही गरज नाही
भाषण दाखवणे हा शाळांसाठी ऐच्छिक विषय
एखाद्या शाळांने भाषण दाखवण्यास दिरंगाई केली तरी त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही होणार नाही

मोबाइलवर ताज्या बातम्या, लेख, भविष्य, लाइव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा mtmobile.in वर

No comments:
Post a Comment